Tuesday, February 5, 2019

                                                                 वैशाख वणवा -१
          १ जानेवारी २०१९ , नवीन वर्षाची सुरुवात ! चांगले संकल्प, चांगले विचार, चांगले संबंध  सगळेच कसे चांगले चांगले व्हावे अशी आपली इच्छा असते परंतु सर्वथा तसे घडतेच असे नाही. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे १ जानेवारी हा एकमेकांना शुभेच्छा देण्याचा दिवस ! मौजमस्ती करण्याचा दिवस  ! दरवर्षी प्रमाणे मित्र मंडळी नातेवाईक यांना शुभेच्छा देण्याच्या तयारीत असतानाच बातमी आली की आमची वडील भगिनी सुलभा वय वर्षे ७७ हिची एक किडनी काम करीत नाही, मूतखडा मूत्र वाहिनीत अडकून राहिल्यामुळे अवरोध निर्माण झाला असून मूत्र पिंडात इन्फेक्शन झाले आहे व त्वरित शस्त्रक्रिया न केल्यास जीव दगावण्याची शक्यता आहे असे निदान नेहमीचे कौटुंबिक डॉ. जी. टी. राणे यांनी केले. हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली. लगोलग म्हापसा येथील निष्णात शल्यविशारद डॉ.  एल्फिस्टन फर्नांडिस यांच्याशी संपर्क केला आणि वेळ न गमावता शस्त्रक्रिया पार पडली अगदी खजुरात असलेल्या बी सारखा दिसणारा सव्वादोन इंच लांबीचा मूतखडा बाहेर काढण्यात आला. हा खडा लंबाकार व मूत्र नलिकेत फसलेला असल्याने लेझर ऑपरेशन शक्य नसल्याचे  डॉक्टरांनी सांगितले होते पण तसा त्यांनी प्रयत्न करून देखील पाहिला आणि अखेरचा पर्याय म्हणून ओपन सर्जरी करणे भाग पडले. दुपारी  एक वाजता पेशंटला ऑपरेशन थियेटर मध्ये नेण्यात आले ! तासा मागून तास जात होते तीन वाजता डॉ. एल्फिस्टन यांचे एक सहाय्यक डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले की लेझर ऑपरेशनचे प्रयत्न करून पाहिले पण शक्य होत नाही, लेझर अधिक दिल्यास किडनीवर ताण येईल तेव्हां ओपन सर्जरी करणे भाग आहे. थिएटरचे पुन्हा दार बंद झाले ते पांच वाजता उघडले ! शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती मात्र धोका टळला नव्हता ! पुढचे ४८ तास पेशंट उपचारांना कसा प्रतिसाद देतो त्यावरच पुढचे सगळे अवलंबून होते. कारण सुलभाला रक्तदाब आणि मधुमेहाचा देखील त्रास होता शिवाय वय हा देखील मुद्दा होताच ! आम्ही देवाचा धावा सुरु केला, किती नवस केले याला गणती नाही.
          आम्ही सर्वजण चिंतातूर अवस्थेत होतो, काही म्हणजे काही सुचत नव्हते. भ्रमणध्वनीवर आप्तेष्टांचे नववर्षाचे बरेच शुभेच्छा संदेश येवून थडकले होते पण  दोन तीन दिवस ते वाचनात आलेच नाहीत ! त्यांपैकी मेसेंजर बॉक्स मध्ये एक संदेश होता जो लंडनवासी एका दूरच्या ( आता दुरान्वयेही संबंध नसलेल्या ) नातेवाईकाचा होता पण तो शुभेच्छा देणारा नव्हता तर नाते संबंध तोडणारा होता. मनाला असंख्य इंगळ्या डसल्या सारखे वाटले. असे संबंध तोडण्या एवढे काय झाले होते ? तर एका दिवाळी अंकात माझा एक ललित लेख प्रसिद्ध झाला होता व त्या लेखात शहरातील माणसे कशी कृत्रिम प्रेम करतात, कामापुरती मामा कशी म्हणतात, गावी आल्यावर गावातील माणसांशी / नातेवाईकांशी कशी वागतात याचे वर्णन केले होते. हे वर्णन कुणा एकट्यासाठी नव्हते आणि असा अनुभव माझा एकट्याचा नव्हता तर प्रातिनिधिक होता ! अनेकांनी तो ललित लेख आवडल्याचे कळवले होते व आपलाही असाच अनुभव असल्याचे सांगितले होते. पण या आमच्या ( आता नाते न टिकलेल्या )  नातेवाईकाला वाटले ते सगळे वर्णन आपल्यासाठीच व आपल्या कुटुंबीयासाठीच आहे ! या त्याच्या समजात भर घातली होती ती दुसऱ्या एका चुगलखोर व बातम्या मीठ मसाला लावून लावालावी करणाऱ्या नातेवाईकाने ! कानांत पेरलेले विष अंगभर पसरते तसे या व्यक्तीच्या बाबतीत झाले होते. गैरसमजाने त्याने नाते संबंध एका झटक्यात तोडून टाकले होते. लहानपणापासून गुंफलेले रेशीम धागे त्यादिवशी तटातटा तुटले ! ज्या दिवशी आमची भगिनी जीवन मरणाच्या दारात ऊभी होती तेव्हांच हा संदेश आला होता ! हा एक कष्टदायक आणि क्लेशकारक योग होता ! संदेश वाचला त्या रात्री मी पूर्ण रात्र झोपू शकलो नाही. बहिणीच्या आजाराचे मनावर दडपण तर होतेच परंतु दूरस्थ नातेवाईकाने पाठविलेला हा निर्वाणीचा संदेश काळीज चिरीत गेला !
          ईश्वर कृपेने आमची बहीण या आजारातून आता बरी झाली आहे. पण त्यावेळचा तो संदेश मनावर कायमचा एक ओरखडा ठेवून गेला !

( The message is as follows from Shrikant Rajaram Mayekar from London on 1st January 2019 at 3.19 p.m. :  Please can you refrain from posting comments like that on my social page.
You have no clue on how to behave on social network it seems. Any negative comments is like public shaming and believe you don't mean to do that. ( or do you ? )
I have not been reacting to your comments and messages for a reason .
I am not changed. You had complain that Baba did'ny do enough to make your life successful whereas all I heard from him is your praise. He gave us your example as an idol.
You were lucky to see him unlike me who lost him even before I could finish my education. And today, whatever 2 pence I'hve achieved is on my own.
I don't waste my time complaining.
 I am also aware of the class and respect that you forcefully expected from my family. You expect gifts to match your standard ? You didn't like home made food and to show your class, you sent mangoes ? I heard you wrote some articles in local news paper as well ! What was that shit ..... today you expect me to be in touch, meet you but for what ? where were you when I lost my dad ?
You are well educated to understand where I'm coming from and what I'm talking about.
I'm sorry to be harsh on the first day of the year but it's my resolution to kill all negative ties this year.
 I'm also sorry if I sound rude. I wish to consider your age and respect you but what you have done with my family, I don't wish to be socially connected anymore.
I wish you a good health, sense and peace for remaining of your life.
I will wait to see your reaction before ending this last thread between us. You may chose to what you do best...... publicaly shame people.
I don't care but don't believe I will let go as well.
P.S. This is all english ( English ) because it's my first language now. I love and am proud to be Marathi so don't think rubbish again. )

       I replied him as follows :
" अत्यंत आभारी आहे, माझी जागा दाखवून दिल्या बद्दल ! धन्यवाद ! "

No comments:

Post a Comment